कुऱ्हेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा धोंगडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:04 PM2021-08-14T23:04:25+5:302021-08-14T23:06:01+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सुरेखा धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Surekha Dhongade unopposed as Deputy Panch of Kurhegaon | कुऱ्हेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा धोंगडे बिनविरोध

कुऱ्हेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा धोंगडे यांचा सत्कार करताना शिवसेना राजाराम नाठे, भाऊसाहेब धोंगडे व ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देखेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सुरेखा धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्याकरिता शनिवारी (दि.१४) विशेष बैठक घेण्यात आली. अत्यंत खेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते बाळू धोंगडे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.

यावेळी पॅनलचे मार्गदर्शक भाऊसाहेब धोंगडे, गंगाराम धोंगडे, दत्तू धोंगडे, अशोक धोंगडे, देवराम धोंगडे, रोहिदास धोंगडे, रमेश गव्हाणे, अर्जुन धोंगडे, ज्येष्ठ नेते तुकाराम धोंगडे, रामदास धोंगडे, माजी सरपंच राजाराम धोंगडे, शिवसेना शाखाप्रमुख विष्णू धोंगडे, प्रकाश गव्हाणे, बाळू पवार, ज्ञानेश्वर धोंगडे, बाबुराव धोंगडे, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.
कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे कामकाज लोकाभिमुख असून ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विकास होत आहे. नूतन उपसरपंच सुरेखा धोंगडे यांच्यासह आम्ही सर्व जण आगामी काळात ग्रामविकास साधण्यासाठी तत्पर राहू.

- भाऊसाहेब धोंगडे, लोकनियुक्त सरपंच, कुऱ्हेगाव.

 

Web Title: Surekha Dhongade unopposed as Deputy Panch of Kurhegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.