महालपाटणे गण पोटनिवडणुकीत सुरेखा निकम बिनविरोध;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:22 PM2019-06-15T23:22:23+5:302019-06-15T23:23:19+5:30

मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Surekha Nikam is elected unopposed in the post-mortem division; | महालपाटणे गण पोटनिवडणुकीत सुरेखा निकम बिनविरोध;

महालपाटणे गण पोटनिवडणुकीत सुरेखा निकम बिनविरोध;

Next
ठळक मुद्देऔपचारिक घोषणा अद्याप बाकी

मेशी : देवळा पंचायत समितीच्या महालपाटणे गणातील पोटनिवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी (१५) निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील आण िमहालपाटणे येथील अरूण आहीरे यांनी माघार घेतल्याने श्रीमती सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यमान पंचायत समतिी सदस्य कै. पंकज सुधाकर निकम यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्र म जाहीर झाला आहे. आज अखेरच्या दिवशी पंकज निकम यांच्या पत्नी सुरेखा निकम यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर, देवळा शिवसेनेचे शहर अध्यक्ष अशोक आहेर, गणेश पाटील, भारत आहिरे, माजी सरपंच बापू जाधव, डोंगरगाव सरपंच दयाराम सावंत, मुन्ना आहिरराव, लालजी सावंत, सोनवणे, सतीश बोरसे आदी उपस्थीत होते.
gram

Web Title: Surekha Nikam is elected unopposed in the post-mortem division;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.