महालपाटणे गणातून सुरेखा निकम बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:30 AM2019-06-16T01:30:50+5:302019-06-16T01:31:28+5:30

महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Surekha Nikam uninterrupted from the mahapatna gun | महालपाटणे गणातून सुरेखा निकम बिनविरोध

महालपाटणे गणातून बिनविरोध निवड निश्चित झाल्याने सुरेखा निकम यांचा सत्कार करताना सोनाली पाटील, केदा अहेर यांच्यासह कार्यकर्ते.

Next

लोहोणेर : महालपाटणे पंचायत समिती गणातून शनिवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश दिलीप पाटील, अरुण पोपट अहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा पंकज निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. लोहोणेर जिल्हा परिषद गटातील महालपाटणे पंचायत समितीचे सदस्य पंकज सुधाकर निकम यांचे निधन झाल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत निंबोळा येथील गणेश दिलीप पाटील व महालपाटणे अरु ण आहिरे व सुरेखा निकम यांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारी (दि.१५) माघारीच्या शेवटच्या दिवशी गणेश पाटील व अरु ण आहिरे यांनी माघार घेतल्याने सुरेखा निकम यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्या निवडीची फक्त औपचारिकता बाकी
आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर, सोनाली पाटील यांच्या हस्ते सुरेखा निकम यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार कार्यालय आवारात कार्यकर्त्यांचे डोळे पाणावल्याने येथील वातावरण भावुक झाल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अशोक आहेर, संचालक प्रदीप आहेर, शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक आहेर, दिनेश पाटील, सोनाली पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापू जाधव, मुन्ना निकम, माजी सभापती सुकदेव आहिरे, भारत आहिरे, राजेंद्र भामरे,भूषण आहिरे आदी नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Surekha Nikam uninterrupted from the mahapatna gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.