जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह चौघांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांकडून जाबजबाब नोंदणी
By admin | Published: April 17, 2015 12:51 AM2015-04-17T00:51:04+5:302015-04-17T00:53:06+5:30
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह चौघांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सुरगाणा धान्य घोटाळा : पोलिसांकडून जाबजबाब नोंदणी
नाशिक : सुरगाणा येथील कोट्यवधी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणी दाखल असलेल्या गुन्'ात अटक टाळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली असून, त्यासाठी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, सुरगाणा पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह या प्रकरणाशी संबंधितांचे जाब-जबाब नोंदविण्यास सुरुवात केल्याने या गुन्'ात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात उघडकीस आलेल्या या धान्य घोटाळा प्रकरणी सुरगाणा पोलिसांत गुदामपाल, वाहतूक ठेकेदार, पुरवठा निरीक्षक व पुरवठा प्रतिनिधी अशांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या गुन्'ात सुरगाणा तहसीलदार एम. बी. तडवीसह अन्य आरोपींना अटक केली आहे व सध्या ते मध्यवर्ती कारागृहात आहेत. या घोटाळ्यात जिल्हा पुरवठा कार्यालयाचाही सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यानच्या काळात विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित होऊन जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांसह तेरा जणांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण राज्यभर हा विषय जसा चर्चिला गेला तसेच त्याचे गांभीर्यही वाढले. त्यामुळे सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश प्राप्त होताच, सुरगाणा पोलिसांनी नाशकात धाव घेऊन जवंजाळ यांना ताब्यात घेतले व त्यांचा जाबजबाब नोंदवून घेतला.