सुरगाण्यात सोमवार ते गुरुवारफक्त अत्यावश्यक सेवाच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:58 PM2021-04-18T16:58:04+5:302021-04-18T16:58:26+5:30
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरगाणा : शहरासह तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता तहसिल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सोमवार ते गुरुवार हे चार दिवस सकाळी ८ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहर व तालुका परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार किशोर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालयात अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चर्चेअंती त्यावर उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा ही सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवावी. बारा वाजता दुकाने बंद करण्याचे आवाहन यावेळी तहसिलदार मराठे यांनी केले.
त्यास उपस्थित सर्व व्यावसायिकांनी प्रशासन जो निर्णय घेईल ते मान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सुरगाणा शहरात सोमवार ते गुरुवार सकाळी ८ ते १२ यावेळेत अत्यावश्यक सेवा सुरू रहाणार आहे. तर शुक्रवार, शनिवार व रविवार हे तीन दिवस मेडिकल व दवाखाने वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत.
तालुक्यात देखील याचप्रकारे व्यवसाय चालू व बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी आरोग्य विभाग, पोलिस व महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मराठे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बाऱ्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, सुरगाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे किराणा व्यापारी पवन कोरीमुथा, बाळकृष्ण संधानशिव, धर्मेंद्र पगारिया, संतोष बागुल, विलास कुंमट, मोना पगारिया, सोना पगारिया आदींसह निलेश खरोटे, कैलास बत्तासे, सुनिल पवार, चेतन संधानशिव, विठ्ठल थोरात आदी व्यावसायिक उपस्थित होते.
सुरगाणा येथे कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दुकानांची वेळ ठरवून देण्याबाबत तहसिलदार किराणा व्यापारींशी चर्चा करताना तहसिलदार किशोर मराठे. समवेत सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे. (१८ सूरगाणा १)