सुरगाण्याचे तीन नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:12 AM2018-11-29T01:12:31+5:302018-11-29T01:12:47+5:30
नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या भाजपाच्या तीन नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे.
नाशिक : नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा आदेशाचा भंग केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या भाजपाच्या तीन नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. योगीता विजय पवार, रेशमा चंदर चौधरी, सुरेश काळू गवळी अशी त्यांची नावे आहेत. निवडणुकीत भाजपा व माकपात लढत झाली. दोन्ही पक्षांना समान जागा मिळालेल्या असताना नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली. अशास्थितीत भाजपाचे गटनेता जयश्री मनोज शेजोळे यांनी सर्व सदस्यांनी व्हीप बजावला होता. असे असूनही भाजपाच्या तिन्ही नगरसेवकांनी पक्षादेश डावलून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याने माकपाचा नगराध्यक्ष निवडून आला. या संदर्भात भाजपाचे गटनेते जयश्री शेजोळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे पक्षांतर बंदी कायद्यान्वये तक्रार दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकाºयांनी तिघा नगरसेवकांना अपात्र ठरविले. या कारवाईमुळे आता सुरगाणा नगरपंचायतीत तीन रिक्त जागांसाठी नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे.