सुरगाण्याची स्मशानभूमी हायमास्ट दिव्यांनी उजळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 10:48 PM2020-12-02T22:48:53+5:302020-12-03T00:40:33+5:30

सुरगाणा : येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे.

Surgana's cemetery was lit by high mast lights | सुरगाण्याची स्मशानभूमी हायमास्ट दिव्यांनी उजळली

सुरगाणा येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिव्यांच्या उद्घाटनप्रसंगी विनोद महाले, भावडू चौधरी, सचिन महाले, रमेश थोरात, ज्ञानेश्वर कराटे, प्रकाश वळवी आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देअंत्यसंस्कार करण्यासाठी सतत अनेक अडचणी येत होत्या.

सुरगाणा : येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारावेळी निर्माण होणारी गैरसोय दूर झाली आहे.
महाले बंधूंच्या वतीने स्वखर्चातून येथील स्मशानभूमीत हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. शहराबाहेर किमान एक किलोमीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी विजेची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी सतत अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी वाहनांचे दिवे, बॅटरी, मोबाइल बॅटरी यांच्या साहाय्याने शक्य तेवढा प्रकाश निर्माण करून अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडावे लागत होते.
विशेषत: नदीपात्रात जाण्यासदेखील सांभाळून जावे लागते. ही प्रमुख गैरसोय लक्षात घेऊन येथील भाजपचे नगरसेवक डॉ. विनोद महाले, भाजयुमो तालुकाध्यक्ष सचिन महाले, नितीन महाले या तिघा भावंडांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्मशानभूमीत दोन हायमास्ट दिवे उभे केल्यामुळे रात्री अंत्यसंस्कारासाठी येणारी अडचण दूर केली आहे.

ज्येष्ठ नागरिक भावडू चौधरी यांच्या हस्ते या नवीन हायामास्ट दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक रमेश थोरात, रंजना लहरे, ज्ञानेश्वर कराटे, भावडू चौधरी, प्रकाश वळवी, प्रशांत पिंगळे, विजय कानडे, कैलास सूर्यवंशी, कैलास थोरात, दीपक खोत, श्याम थोरात, बाळकृष्ण सूर्यवंशी, चिंतामण कामडी, विशाल शिरसाठ, नीलेश थोरात आदी उपस्थित होते.



 

Web Title: Surgana's cemetery was lit by high mast lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.