सुरगाण्यात अधिक्षकाच्या गाडीच्या काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 09:34 PM2018-08-18T21:34:19+5:302018-08-18T21:36:08+5:30
शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या वस्तीगृह अधिक्षकाच्या कारची पुढील व मागील काच अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. असे प्रकार कायम होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सुरगाणा : शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या वस्तीगृह अधिक्षकाच्या कारची पुढील व मागील काच अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. असे प्रकार कायम होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून ठोस कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. गेल्या वर्षी बारा जुलै रोजी शेजारील वसतीगृहाच्या अधिक्षिका श्रीमती अलका दाभाडे यांच्या कारच्या सर्व काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यांनीही फिर्याद दिली होती. मात्र पूढे काही झाले नाही. आठ नऊ वर्ष ईमानदारीने काम करूनही त्याचे फळ यापद्धतीने मिळाल्याचा खेद व्यक्त करु न त्यांनी येथून बदली करु न घेतली होती. या आधीही वाहने जाळणे किंवा काचा फोडण्याचा प्रकार घडला असून आतापर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. काही दिवसांपूर्वी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर पवार यांची कार जाळली होती. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एक वर्षाच्या अंतराने दूसऱ्या वसतीगृहाच्या अधिक्षिका प्रज्ञा तायडे यांनाही असाच फटका बसला आहे. उंबरठाण रस्त्यालगत आतील बाजूस आदिवासी मुलींची दोन्ही शासकीय वसतिगृह आहेत. यापैकी एका वसतिगृहात अधिक्षिका म्हणून श्रीमती प्रज्ञा तायडे या कार्यरत आहेत. तायडे यांच्या मालकीची मारूती सुझुकी कार क्र . एम एच ०५ बी एस ०९२७ ही वस्तीगृहाच्या गेट समोर उभी केलेली होती. पहाटे ३ वाजे दरम्यान अज्ञात व्यक्तींनी कारच्या दर्शनी व मागील बाजूच्या काचांवर मोठाले दगड टाकून फोडल्या. काचा फुटल्याचा आवाज झाल्या नंतर ड्युटीवर असलेले चौकीदार टी. सी. चौधरी यांनी पुढील लोखंडी दरवाजाचे कुलूप उघडले मात्र तो पर्यंत अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या बाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेतील काही संशयीतांची नावे पोलिसांना मिळाली असल्याचे समजते. पोलिस निरीक्षक सुनिल खरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक मछंीद्र दिवे करित आहेत.