दोडी रुग्णालयात शस्त्रक्रिया क्षमता तीनपट वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:04 AM2021-07-13T04:04:35+5:302021-07-13T04:04:35+5:30

परिसर सुधारणा करण्यासह शस्त्रक्रिया विभागाची सज्जता वाढवावी, यासाठी काही दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. तसेच दोन कोटी रुपयांचा प्रस्तावही ...

The surgical capacity of Dodi Hospital will be tripled | दोडी रुग्णालयात शस्त्रक्रिया क्षमता तीनपट वाढणार

दोडी रुग्णालयात शस्त्रक्रिया क्षमता तीनपट वाढणार

Next

परिसर सुधारणा करण्यासह शस्त्रक्रिया विभागाची सज्जता वाढवावी, यासाठी काही दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली होती. तसेच दोन कोटी रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. तेव्हापासून ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियांची व्याप्ती वाढविण्यासह विविध सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली. रुग्ण व परिसरातील गावांतील मागणी वाढू लागल्याने निधी उपलब्ध झाला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व लक्ष्य मोहिमेअंतर्गत शस्त्रक्रिया विभागाचा विस्तार वाढविण्यात येत आहे. डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे यांनी या कामाची पाहणी केली. शस्त्रक्रिया विभागाच्या इमारतीचे नव्याने सुरू असलेले काम, त्याचा दर्जा, शस्त्रक्रिया विभागासाठी बांधकामात अत्यावश्यक असलेल्या बाबींची थोरात यांनी पाहणी केली. तीन महिन्यांपासून सुरू असलेली लसीकरण मोहीम, कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट याचा डॉ. थोरात यांनी आढावा घेतला व कामाबाबत समाधान व्यक्त केले.

विविध कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) मिळालेली रुग्णवाहिका व इतर साहित्याची माहिती डॉ. थोरात यांनी घेतली. अधीक्षक डॉ. शरद पाटील, डॉ. वीरेंद्र सिंग, डॉ. गिरिश भालेराव, डॉ. सुशील पवार, विजय पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

इन्फो...

नवीन शस्त्रक्रिया विभागातील सुविधा...

रुग्णालयात एका वेळी एकच प्रसूती शस्त्रक्रिया व अन्य रुग्णावरील केवळ एक शस्त्रक्रिया करण्याची सुविधा होती. आता नवीन शस्त्रक्रिया विभागात विविध आजारांवरील एकाचवेळी तीन रुग्णांवर शस्त्रक्रिया चालू शकतील, तर एका वेळी तीन प्रसूती शस्त्रक्रियाही होऊ शकतील. प्रसूती शस्त्रक्रियेसाठी वेगळी, तर अन्य शस्त्रक्रियांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

फोटो - १२ दोडी१

दोडी ग्रामीण रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया विभाग विस्तार कामाची पाहणी करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, अधीक्षक डॉ. शरद पाटील, डॉ. वीरेंद्र सिंग आदींसह कर्मचारी.

120721\12nsk_11_12072021_13.jpg

दोडी ग्रामीण रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया विभाग विस्तार कामाची पाहणी करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात. समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, अधीक्षक डॉ. शरद पाटील, डॉ. वीरेंद्र सिंग आदींसह कर्मचारी.

Web Title: The surgical capacity of Dodi Hospital will be tripled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.