कोट्यवधींच्या गैरव्यवहारातील संशयित न्यायालयास शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:20 AM2018-08-23T01:20:47+5:302018-08-23T01:21:09+5:30
: शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्याने मंगळवारी (दि़ २१) तो न्यायालयास शरण आला़ सातपूर पोलिसांनी पाटीलचा ताबा घेतला असून, न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़
नाशिक : शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्याने मंगळवारी (दि़ २१) तो न्यायालयास शरण आला़ सातपूर पोलिसांनी पाटीलचा ताबा घेतला असून, न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ जगदीश माणिकचंद अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात १२ एप्रिल २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०१२ ते ५ आॅगस्ट २०१६ या कालावधीत संशयित किशोर पाटील याने अग्रवाल यांचा मुलगा माधव यास न्यू लाइट कंपनीस ७५ एकर जागा हवी असून, ती बघून ठेव़ संबंधित जागा कंपनीस अधिक दराने विक्री करून जास्तीत जास्त नफा कमवू असे आमिष दाखविले़ या आमिषाला बळी पडून जगदीश व माधव अग्रवाल यांनी १ कोटी ३१ लाख २५ हजार तसेच इतरांकडील १ कोटी ३८ लाख असे २ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये दिले़ मात्र, संशयित पाटील याने पैसे घेतले पण कोणताही व्यवहार केला नाही वा पैसेही परत केले नाहीत़ यामुळे फसवणूक झालेल्या जगदीश अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी पाटील यानी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती़ मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व अर्ज नामंजूर केल्याने ते न्यायालयास शरण आले़