घरांच्या मागणीसाठी भुजबळ यांच्या वाहनाला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 10:44 PM2022-03-29T22:44:01+5:302022-03-29T22:46:08+5:30
लासलगाव : ह्यआमदारांना घरे देता; मग आम्हाला का नाही?ह्ण असा सवाल करीत येथील संजयनगरमधील झोपडपट्टीवासीयांनी राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवीत गराडा घातला. अचानक घडलेल्या प्रकारांमुळे भुजबळदेखील आश्चर्यचकित झाले होते.

गेल्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार जरी झाला असला तरी सत्ताधारी मंत्र्यांना या निर्णयाच्या विरोधात तोंड देण्याची नामुष्की ओढवली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या विरोधात उमटलेल्या पडसादाला सामोरे जाण्याची वेळ पालकमंत्री भुजबळ यांच्यावर लासलगावी आली.
भुजबळ हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना लासलगाव येथे शिलाई मशीन वाटप व रस्ता सुधारणा कामाच्या उद्घाटनासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर नाशिककडे रवाना होत असताना लासलगाव येथील संजयनगरमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी त्यांची गाडी अडवत घेराव घातला.
आम्ही सुद्धा तुम्हाला भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी मत दिल्याची आठवण करून देत आमदारांना राज्य शासन घरे बांधून देणार आहे; मग आम्हाला का नाही? असा सवाल महिला व पुरुषांनी भुजबळ यांना केला. अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे पालकमंत्री भुजबळ काही क्षण निरुत्तर झाले होते.