सव्वा लाख नागरिकांचे पेठ तालुक्यात सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:14 AM2021-05-07T04:14:54+5:302021-05-07T04:14:54+5:30
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक २८ एप्रिल ते २ मेदरम्यान तालुक्यातील १४४ महसुली गावांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक २८ एप्रिल ते २ मेदरम्यान तालुक्यातील १४४ महसुली गावांतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण विभागाच्या संयुक्त पथकामार्फत कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १ लाख ३२ हजार ९७० नागरिकांपैकी १ लाख २७ हजार ६७ नागरिकांच्या घरी भेट देऊन तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कोविडची लक्षणे दिसून आल्यास अशा नागरिकांची चाचणी करून उपाययोजना करण्यात आल्या.
इन्फो
लसीकरणाबाबत जनजागृती
पेठसह ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लससंदर्भात अनेक समज व गैरसमज असल्याने सामान्य नागरिक लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नसल्याचे दिसून आले. यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांनी गावोगाव लसीकरणसंदर्भात जनजागृती करून प्रबोधन केले.
इन्फो
पेठ तालुका कुटुंब सर्वेक्षण
एकूण महसुली गावे - १४४
एकूण ग्रामपंचायत - ७३
प्राथमिक आरोग्य केंद्र - ७
उपकेंद्र - २९
एकूण घरे - २४१७१
भेट दिलेली घरे - २४०४२
एकूण लोकसंख्या - १३२९७०
भेट दिलेली लोकसंख्या - १२७०६७