ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 6687 कुटुंबाचे सर्वेक्षण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:02 PM2020-09-26T17:02:50+5:302020-09-26T17:03:40+5:30
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुंटूब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली.
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुंटूब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात आली.
ठाणगाव आरोग्य केंद्रा अतंर्गत डुबेरे, हिवरे,मनेगाव, पाटोळे या उपकेंद्रातील 16 गावातील 6687 घरातील एकूण 36 हजार लोकांचे 21 पथकाद्वारे सर्वेक्षण सुरु करण्यात आले
10 आक्टोबर पर्यंत पहील्या टप्प्यात तापमान, अॉक्सीजन, को.मॉरबीड व्यक्तीची तपासणी आरोग्य सेवक,आशा कार्यकर्ता यांच्या कडून दररोज 50घरांचे सर्वेक्षण करण्यात येत असून त्यात कोवीडची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीच्या संर्दभात करण्यात येत आहे .
'माझे कुटूंब माझी जबाबदारी ' या उपक्रमाबाबत डुबेरे या उपकेंद्रात 19 गावातील 21पथकातील आशा कार्यकर्ता व आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले.पथकांना मास्क सॉनिटायझर, ग्लुकेजचे वाटप करण्यात आले.
ठाणगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आर.डी.धादवड यांनी घरातील कुटूंबाचा सर्वे करतांना कोणत्या गोष्टी बाबत जास्त गाभीर्य पाळायचे याबाबत माहिती दिली.यावेळी डॉ.भाग्यश्री परदेशी , समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.उपेंद्र आहीरे, डॉ.सतिश केदार, डॉ.वंदना खेडकर, डॉ.श्रध्दा आव्हाड, आशा गटप्रवर्तक ललिता वारुगंसे यांच्या सह 19 गावातील सर्व आशा व आरोग्य सेवक उपस्थित होते.
चौकट-
ठाणगाव आरोग्य केंद्राच्या वतीने 'माझे कुटूंब माझी जबाबदारी "हा उपक्रम राबविण्यात येत असून
ग्रामस्थांनी आपल्या घरी येणाऱ्या आशा कार्यकर्ता व आरोग्य सेवकांना खरी माहीती देण्यात यावी, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीची जबाबदारी आपण स्वःतावर घेऊन आपल्या त्यांना घरातच बसवा व खुपच गरजेचे काम आसेल तरच घराबाहेर पडा.
- डॉ.आर.डी.धादवड
वैद्यकिय अधिकारी ठाणगाव आरोग्य केंद्र.