दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण

By Suyog.joshi | Published: January 24, 2024 07:24 PM2024-01-24T19:24:39+5:302024-01-24T19:24:48+5:30

मराठा आरक्षण : महापालिकेत शुकशुकाट.

Survey of one lakh houses in two days | दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण

दोन दिवसात एक लाख घरांचे सर्वेक्षण

नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या दोन दिवसात सुमारे एक लाख घरांमध्ये मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण करण्यात आले. यात महापालिकेचे सुमारे २७०० कर्मचारी सर्वेक्षण कामात व्यस्त असल्याने राजीव गांधी भवन येथे शुकशुकाट पाहायला मिळायला. त्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. हा सर्वे ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 

पहिल्याच दिवशी ४७ हजार घरांचे सर्वक्षण करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईतील आंदोलनासाठी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे राज्य सरकारची धावपळ सुरू झाली असून कुणबी नोंदी तपासण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला विविध जिल्ह्यांमध्ये ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्या सर्व पात्र कुटुंबांना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीचे दाखले तातडीने द्यावेत, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. जिल्ह्यात दोन लाख आठ हजार ४० कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर शहरात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणासाठी महापालिकेचे २७०० सेवक प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Web Title: Survey of one lakh houses in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक