बोरवठ परिसरात संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:15 PM2020-07-04T15:15:20+5:302020-07-04T15:16:02+5:30

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.

Survey of potential dam area in Borwath area | बोरवठ परिसरात संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी

बोरवठ परिसरात संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा उपाध्यक्ष : ओलीता खालील क्षेत्र वाढणार

पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झरिवाळ यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.
बोरवठ गावाच्या परिसरातून दोन नद्यांचा ऊगम होतो. या दोन्ही नद्यांचा प्रवाह अडवून धरण बांधल्यास पेठ तालुक्यातील बोरवठ सह जांबविहीर, करंजाळी, देवगाव, उस्थळे परिसरातील जवळपास ३०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याबाबत झिरवाळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकारी व नागरिकांशी जागेची पाहणी करून चर्चा केली.
याप्रसंगी तहसीलदार संदिप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सरपंच सोनाली कामडी, नामदेव पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, चेअरमन पद्माकर कामडी, महादु महाले, पुंडलीक गुरु जी, एल. डी. राऊत, चिंतामण लाखण, सुरेश पवार, चिंतामण पवार, मुरलीधर राऊत, विद्याधर राऊत पोलीस पाटील रविद्र पाटील, आनंदा पाटील, रोहिदास राऊत, ग्रामसेवक बाळासाहेब मगर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बोरवठ येथे संभाव्य धरण क्षेत्राची पाहणी करतांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संदिप भोसले, नम्रता जगताप, पद्माकर कामडी, सोनाली कामडी, बाळासाहेब मगर आदी.

Web Title: Survey of potential dam area in Borwath area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.