बंदोबस्तात होणार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:04 AM2019-02-15T01:04:42+5:302019-02-15T01:05:37+5:30

नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने पोलीस आयुक्तांना नव्याने तयार होणाºया रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणकामी मदत करण्यासाठी असलेल्या पत्राची प्रत आज नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून दिली.

Survey of Railway route to be organized | बंदोबस्तात होणार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

बंदोबस्तात होणार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण

Next

देवळाली कॅम्प : नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाऱ्या पुण्याच्या कंपनीने पोलीस आयुक्तांना नव्याने तयार होणाºया रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणकामी मदत करण्यासाठी असलेल्या पत्राची प्रत आज नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून दिली.
मंगळवारी सकाळी नानेगाव ग्रामस्थांनी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण कामास विरोध करताना संबंधित कर्मचाºयांना पळवून लावले होते. बुधवारी सकाळी नानेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात महाराष्ट्रमधील रेल्वेची कामे करणाºया कंपनीने ड्रोन डोअर एरियलद्वारे १५ नोव्हेंबर ते २५ फेबु्रवारीपर्यंत सर्व्हे करण्याची परवानगी मिळालेली असून, या कामाकरिता सहकार्य करण्याच्या भूमिकेचे पत्र गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून दिले. विशेष म्हणजे या पत्राची प्रत पोलीस आयुक्तांनाही देण्यात आल्याने यापुढे ग्रामस्थांनी विरोधाची भूमिका घेतल्यास पोलीस बंदोबस्तात काम करण्यात येईल, असेही त्यांचे म्हणणे आहे. शेवगेदारणा ग्रामस्थांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेतला असून, शेतकºयांना न विचारताच सर्वेक्षण कसे केले, असा सवाल केला जात आहे.

Web Title: Survey of Railway route to be organized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.