सुरगाण्यातील श्रीभुवन व दुमी योजनेचे जलसंपदा मंत्र्यांच्या सुचनेनुसार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 04:58 PM2020-10-02T16:58:52+5:302020-10-02T17:08:57+5:30
कळवण : सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करु न लाभ क्षेत्रातील आदिवासी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्न व शंकाचे यंत्रणेकडून निरसन झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
कळवण : सुरगाणा तालुक्यातील नियोजित दुमी व श्रीभुवन लघुपाटबंधारे प्रकल्पाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची आमदार नितीन पवार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी पहाणी करु न लाभ क्षेत्रातील आदिवासी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या प्रश्न व शंकाचे यंत्रणेकडून निरसन झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी दुमी व श्रीभुवन प्रकल्पाचा प्रस्ताव शासनस्तरावर तात्काळ सादर करण्याच्या सुचना संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रकल्पस्थळावर दिल्या.त्यामुळे सुरगाणा तालुक्यात सिंचन योजना मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
नाशिक येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील प्रास्तवित सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली होती. पाटील यांनी जलसंपदा विभागाचे कोकण महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे व यंत्रणेला आमदार नितीन पवारांसमवेत सुरगाणा तालुक्यातील दुमी व श्रीभुवन योजनाचे सर्वेक्षण व प्रकल्पस्थळाची पहाणी करु न अहवाल सादर करण्याचे आदेश बैठकीत दिले होते.
सुरगाणा तालुक्यात एकही मोठी सिंचन योजना नसल्याने केवळ २ टक्के सिंचन होते, पाण्याची टंचाई जाणवते, उन्हाळ्यात रोजगारासाठी गुजरात राज्यात होणारे तालुक्यातील स्थलांतर रोखण्यासाठी सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून जमीन ओलिताखाली आणणे हा एकमेव पर्याय आहे.
सुरगाण्यातील स्थलांतर रोखण्यासाठी नामदार पाटील यांनी सुरगाण्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचे आश्वासन बैठकीत दिले व सुरगाण्यातील योजनांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्यामुळे यंत्रणेने श्रीभुवन व दुमी योजनेची पहाणी करु न आदिवासी बांधवांशी संवाद साधला.
यावेळी जलसंपदा विभागाच अधिकारीसह , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार, जिल्हा परिषदचे माजी सदस्य गोपाळ धूम, काशिनाथ वाघमारे, युवराज लोखंडे,एकनाथ वार्डे आदी उपस्थित होते.
दुमी प्रकल्प हा पार नदीवर असून साठवण क्षमता १७०० द.ल.घ.फु. आहे. त्या अंतर्गत दोन कालवे असून एक कालवा ३४.१३ कि.मी. व दुसरा ४२.१७ कि. मी. आहे. दोन्ही कालव्या अंतर्गत सुरगाणा, पेठ व दिंडोरी हया तालुक्यातील ३५ गावांचे ५००० एकर क्षेत्र सिंचनाखालील येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा सविस्तर अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी कोकण महामंडळामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे.
- आमदार नितीन पवार, कळवण, सुरगाणा. (फोटो०२कळवण,१)