अनुसूचित जाती समितीकडून अभ्यासिकेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:14 PM2018-09-29T22:14:47+5:302018-09-29T22:15:07+5:30
सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
या समितीचे प्रमुख आमदार हरिष पिंगळे यांच्या समवेत समितीच्या सदस्यांनी शनिवारी (दि.२९) शहरातील लोकेनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती पतसंस्था व सिन्नर तालुका जनसेवा मंडळ संचलित, लोकनेते अभ्यासिकेस सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी समितीच्या सदस्याचे स्वागत केले. यावेळी समितीचे प्रमुख आमदार हरिष पिंगळे, आमदार जोगेंद्रजी कवाडे, आमदार डॉ. मिलिंद माने तसेच समितीचे उपसचिव एन.आर. थिटे, समाजकल्याण अधिकारी प्राची वाजे यांच्यासह नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक विजय जाधव, पाणीपुरवठा समिती सभापती पंकज मोरे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पतसंस्थेचे अध्यक्ष टी. आर. वाजे, अंबादास वाजे, रामनाथ पावसे, बजुनाथ शिरसाट, जनसेवा मंडळाचे अनिल कवडे, संतोष खर्डे, संदीप ठोक आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.महाराष्ट्र विधिमंडळाच्या अनुसूचित जाती समितीने सिन्नर शहरातील लोकनेते अभ्यासिकेस भेट दिली. त्यावेळी आमदार कवाडे बोलत होते. महाराष्ट्र विधान मंडळाची अनुसूचित जाती समिती तीन दिवसीय नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली आहे.