ठाणगावी आरोग्य विभागातर्फे सर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:42 PM2020-06-26T12:42:18+5:302020-06-26T12:43:07+5:30
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंन्टोमेन्ट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे.
ठाणगाव: सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंन्टोमेन्ट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे. बुधवारी चार रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर आरोग्य यंञणा खडबडून जागी झाली असून आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी कार्यकर्ता यांच्या मार्फत सर्व्हे सुरु आहेत. प्रत्येक घरोघरी जाऊन घरातील व्यक्तीची तपासनी करण्यात येत आहे. कोरोनाबाबत घाबरु नका पण काळजी घ्या या बाबतचे पञके प्रत्येक घरोघरी वाटप करत आहे. आजार लपवू नका कोरोना बाबत काही लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी लगेच संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. ठाणगाव येथे रुग्ण निघाल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड यांनी ठाणगावला भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन बैठकीत त्यांनी १४ दिवस गाव पूर्णपणे बंद ठेवण्यास सांगितले. जर कोणी आपले दुकान उघडले तर त्यास दोन हजार रुपये दंड करावा, गावात जर कोणी बिगर मास्कचे फिरत असतील तर त्यांना शंभर रुपये दंड करावा असे सांगितले. कंन्टोमेन्ट झोन असणा-या भागात ४४ कुंटूब राहात असून ३३४ इतकी लोकसंख्या या भागात आहे.पाच टिम द्वारे संपूर्ण गावत सर्व्हे करण्यात येत आहे.