मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:53 PM2019-05-09T18:53:20+5:302019-05-09T18:53:39+5:30
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज यांची व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील अंबडच्या वेअर हाउस येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार असल्याने अंबड वेअर हाउस येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करून नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज यांची व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच मतमोजणीच्या दिवशी मीडिया कक्षासाठी निश्चित केलेल्या जागेचीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अंबड येथील सुरक्षा अधिका-यांना दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अरविंद अंतुर्लीकर, कुंदन सोनवणे, प्रकाश थविल, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.