विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 04:12 PM2020-07-12T16:12:42+5:302020-07-12T16:13:25+5:30
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील एका विहीरीत रात्रीच्या वेळी पडलेल्या कोल्ह्यास दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मोहाडी येथील सुनिता वानले यांच्या मालकीच्या पालखेड रोडवरील गट क्र. ३८६ मधील विहिरीत शनिवारी रात्री एका कोल्हा पडल्याची घटना घडली. भरपूर पाणी असूनही विहिरीच्या कपारीत जागा असल्याने कोल्ह्याने तेथे बसून रात्र काढली. दुसºया दिवशी सकाळी स्थानिक शेतक-यांच्या सदर बाब लक्षात आल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रवीण जाधव यांना सांगितली. त्यांनी दिंडोरी वनक्षेत्रपाल गांगोडे यांना कळविल्यावर उमराळेचे वनपाल वैभव गायकवाड, चंद्रभान जाधव यांनी येऊन ग्रामस्थांचे मदतीने कोल्ह्याला जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. याकामी स्थानिक शेतक-यांसह प्राचार्य विलास देशमुख, उपसरपंच बाबासाहेब निकम, धनंजय वानले,सुनील जाधव,भगवान वानले,उमेश वानले,संजय जाधव,नेताजी जाधव यांचे सहकार्य लाभले.