वडनेर परिसरात खरीप पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:29 PM2020-06-17T21:29:36+5:302020-06-18T00:25:25+5:30
वडनेर : थोड्याफार पावसावर पेरणीची सुरुवात गाव परिसरात झाल्यानंतर आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पावसाने पुन्हा समाधानकारक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी ओढे-नाले खळाळून वाहिले तर काही ठिकाणी शेतातून बाहेर पाणी वाहत होते. दोन्हीही लेंडीनाले वाहून निघाले आहेत.
वडनेर : थोड्याफार पावसावर पेरणीची सुरुवात गाव परिसरात झाल्यानंतर आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पावसाने पुन्हा समाधानकारक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने तालुक्यात ठिकठिकाणी ओढे-नाले खळाळून वाहिले तर काही ठिकाणी शेतातून बाहेर पाणी वाहत होते. दोन्हीही लेंडीनाले वाहून निघाले आहेत. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाºया मालेगाव तालुक्यातील वडनेरसह काटवण परिसरात गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने कृपादृष्टी दाखविल्याने शेतशिवार हिरवीगार होत आहे. परिसरात अल्पशा पावसावर पिकांची पेरणी केल्यानंतर चांगल्या पावसाची प्रतीक्षा होती. परिसरातील मका तसेच बाजरीची पेरणी करण्यात येत आहे. चांगल्या प्रमाणात पाणी मिळाले तर पिकात दाणे उतरतात असे म्हणतात, त्यामुळे सोमवारी झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाने हजेरी लावली असून, अल्प पावसाने तग धरून असलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर मका लागवड केली जाते. पावसाळ्यातील हुकमी पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. मक्याबरोबरच बाजरी पेरली जाते. पेरणीची कामे जेमतेम संपण्याच्या मार्गावर आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे, परंतु लष्करी अळीची टोळधाडीची भीती कायम आहे.
रस्त्यातच पावसाच्या पाण्याचे साचले डबके
नाशिक : परिसरामध्ये रस्त्यातच पावसाच्या पाण्याचे डबके तुंबलेले असून, पायी जाणारे नागरिक आणि वाहन चालविणारे चालक यांना मार्गक्र मण करताना त्रास होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता असून, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे या दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी गटार साफ करण्याची गरज निर्माण झाली आहे.