कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:43 AM2019-06-14T00:43:36+5:302019-06-14T00:45:03+5:30
कुपोषण निर्मूलनाचा भाग म्हणून यंदाही बालविकास व आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या बालकांची शारीरिक व आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख व पालकांचे पोषण विषयक समुपदेशनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
नाशिक : कुपोषण निर्मूलनाचा भाग म्हणून यंदाही बालविकास व आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण भागात कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून, या सर्व्हेक्षणात आढळलेल्या तीव्र कुपोषित बालकांना ग्राम बाल विकास केंद्रांमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या बालकांची शारीरिक व आरोग्याची परिस्थिती पाहता त्यांना अतिरिक्तआहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख व पालकांचे पोषण विषयक समुपदेशनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.
कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार शून्य ते सहा वयोगटांतील तीव्र कुपोषित बालकांसाठी नाशिक जिल्ह्णात यावर्षीही ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. या ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पहिल्या टप्यात उपकेंद्रनिहाय बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात येणार असून, शून्य ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी बालकांचे सर्वेक्षण करून सर्वेक्षित सर्व बालकांची १०० टक्के वजन घेण्यात येणार आहे. यामधून जी बालके तीव्र कुपोषित असतील अशा बालकांसाठी बाल उपचार केंद्र, राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र व ग्राम बाल विकास केंद्र या माध्यमातून उपचार, पोषक आहार व आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे. सदर बालकांच्या पालकांना गृहभेटीद्वारे पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने तयार करण्यात येणाºया ग्रामपंचायत विकास आराखड्यात महिला व बालविकासासाठी असलेल्या निधीतून आहारावर खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सदस्यांचे याकामी सहकार्य घेण्यात येणार आहे.
असून, या संदर्भात मागील वर्षी जिल्ह्णातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यामार्फत तालुका व प्राथमिक स्तरावरील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.