गोंधळ-जागरण परंपरा टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:17 PM2019-03-02T17:17:18+5:302019-03-02T17:18:23+5:30
खामखेडा : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विध्नपणे पार पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हिन्दूधर्मात कुलधर्म, कुलाचार, करण्यासाठी जागरण-गोंधळाच्या परपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.
खामखेडा : प्राचीन काळापासून विवाह समारंभ निर्विध्नपणे पार पडावा यासाठी देवाला साकडे घालण्यासाठी हिन्दूधर्मात कुलधर्म, कुलाचार, करण्यासाठी जागरण-गोंधळाच्या परपरा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.
कुटूंबातील व्यक्ति देव्हाऱ्यातील देव घेऊन जेजुरीला, खंडोबाला भेटून आणले किंवा घरातील कोणत्याही मुलामुलीचे लग्न जमले की कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या वाघ्या -मुरळीच्या जागरणाचा व कुलदेवता असलेल्या तुळजाभवानीच्या गोंधळी गिताचा कार्यक्र म करण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु आहे.
पूर्वी या जागरण-गोंधळ कार्यक्र मासाठी जेजुरीहुन वाध्या-मुरळी येत असे. सध्या सर्वत्र लग्न सराईचा धडाका चालु आहे. ज्याच्या घरात मगलकार्य असते, त्या घरात कार्यारंभ करण्यापूर्वी जागरण-गोंधळ करण्याची परंपरा आहे. यात खंडोबाची तळी भरणे, लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरवणे, दिवटी-बुदलीत रात्रभर पेटवून ठेवणे. या जागरणासाठी रात्रभर देवदेवताचे गीत गायन, पोवाडे, देवांच्या कथा सांगितल्या जातात.
या कार्यक्र मसाठी सोयरे, पाहुणे, नातेवाईक, गावातील मित्र पीावार आदिंना निमंत्रण दिले जाते.जागरण-गोंधळ असता. त्या दिवशी सायंकाळी मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण दिले जाते. शक्यतोवर मांसाहारी जेवण जास्त आसते. सायंकाळी दिवटया काढून नैवेद्य दखविण्यात येतो. रात्री दहा वाजेनंतर जागरण-गोंधळ कार्यक्र माला सुरवात होते.
रात्रभर विविध कार्यक्र म सुरु असतात. पहाटेच्या वेळेस लोखंडी कडी असलेली साखळीचे लंगर लावले जाते, आणि तो ज्याच्याकडे जागरण तो लोखडी लंगर तोडून डोक्यावरील ओझे उतरविले म्हणून मोकळा होतो.
तेव्हा महाराष्ट्राच्या ही संस्कृतीची परंपरा असलेला जागरण-गोंधळाला आजही विशेष महत्व अजुनही ग्रामीण भागात टिकून आहे. देवीच्या गोंधळाने संसारातील गोंधळ कमी होऊन घरात सुखशांती नांदते आसा आशिर्वाद गोंधळी देतात. सध्या सर्वत्र जागरण-गोंधळ कार्यक्र म सर्वत्र चालू असल्याने वाघ्या-मुरळी या लोकांचे भाव वधारले आहेत. त्यामुळे सध्या त्यांना मागणी मोठया प्रमाणात आहे. या जागरण-गोंधळ कार्यक्र म करणाऱ्या लोकांना काही वेळेस ज्यादा पैसही मोजावे लागतात.
(फोटो ०२ गोंधळ) जागरण-गोंधळ कार्यक्र माची पूजा-विधी करतांना.