कांदा आवक टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 11:25 PM2021-07-18T23:25:56+5:302021-07-19T00:21:09+5:30
येवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसुल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. तर बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे दिसून आले.
येवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसुल उपबाजार आवारावर उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती. तर बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह परदेशातही मागणी सर्वसाधारण राहिली.
सप्ताहात एकूण कांदा आवक ६१२४६ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान रु. ३०० ते कमाल १५७५ रुपये तर सरासरी १४२५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.
उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकूण आवक ३१८४८ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल १६८१ तर सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते.