येवल्यात कांदा आवक टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 00:05 IST2021-06-27T00:04:04+5:302021-06-27T00:05:56+5:30
येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात गत सप्ताहात उन्हाळ कांदा आवक टिकून राहिली, तर बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.

येवल्यात कांदा आवक टिकून
येवला : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारात गत सप्ताहात उन्हाळ कांदा आवक टिकून राहिली, तर बाजारभावात थोडीशी सुधारणा झाल्याचे दिसून आले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आदी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ५५ हजार ३२१ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते कमाल २१७० रुपये, तर सरासरी १७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची एकूण आवक ३५ हजार ९७९ क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते कमाल २१४२ रुपये, तर सरासरी १७०० प्रतिक्विंटलपर्यंत होते.