उन्हाळ कांदा आवक टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 08:10 PM2019-06-22T20:10:32+5:302019-06-22T20:11:43+5:30
येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.
येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात सर्वसाधारण मागणी होती.
सप्ताहात कांद्याची एकुण कांदा आवक २९६५३ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४०० ते १४०० तर सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ११३५८ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ३०० ते १३३२ तर सरासरी ११०० प्रति क्विंटल पर्यंत होते.
सप्ताहात गव्हाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हाची एकुण आवक १२ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १८५८ ते कमाल २१७६ तर सरासरी २००० पर्यंत होते. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २० क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १६७५ ते कमाल २३३५ तर सरासरी २१५१ पर्यंत होते.
सप्ताहात हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. हरभºयाची एकुण आवक २८ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३३०० ते कमाल ४२४३ तर सरासरी ३८०१ पर्यंत होते.
सप्ताहात सोयबीनची एकुण आवक ४६ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३४७१ ते कमाल ३५१० तर सरासरी ३५०० पर्यंत होते. सप्ताहात मकाच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. मक्याची एकुण आवक १२ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९२५ ते कमाल २१०० तर सरासरी २०५० प्रतिक्विंटल पर्यंत होते. सदर माहिती बाजार समितीचे प्र. सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली.