विहिरीत पडलेल्या कबुतराला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 07:08 PM2021-07-27T19:08:31+5:302021-07-27T19:09:20+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे पाण्याने भरलेल्या विहिरीत जखमी अवस्थेत पडलेल्या कबुतराला तुषार घुले, प्रशांत चव्हाणके, गोरख शिंदे, समाधान शिंदे, समाधान सोमसे, मुन्ना चव्हाणके, सोनू शिंद आदी तरुणांना यश आले.

मुखेड फाटा येथे काही तरुण मक्यावर औषध फवारणी करत होते. मक्यावर औषध फवारणी करत असताना पुन्हा औषध आणि पाणी आणण्यासाठी तुषार घुले विहिरीकडे गेले असता त्यांना एक कबुतर जखमी अवस्थेत पाण्यात पडल्याचे आढळून आले. घुले यांनी क्षणाचाही विलंब न करता औषध मारत असलेल्या बाकी मित्रांना आवाज देत कबुतर पाण्यात पडले असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी घुले यांनी तात्काळ पाण्याने भरलेल्या विहिरीत थेट उडी मारली.
यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ जवळ असलेल्या बादलीला दोर बांधत बादली विहिरीत सोडली. विहिरीत असलेल्या घुले यांनी अलगद कबुतराला पाण्यातून उचलत बादलीत ठेवून मित्रांनी बादली वर ओढून घेतली. यावेळी कबुतराच्या डाव्या पायाला जखम झालेली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी या तरुणांनी कबुतराच्या पायावर योग्य उपचार करून नंतर कबुतराला सोडून दिले.