सायगाव येथील तरु णांनी वाचविले घोड्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:23 PM2018-11-11T18:23:18+5:302018-11-11T18:24:27+5:30

सायगाव ता येवला येथे जनावरांच्या चार्याबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही त्यात जनावरे स्वत: पाण्याचा शोध घेत आहे. सायगाव फाटा येथे मगन पठारे यांच्या 50 फूट खोल विहिरीत पाण्याचा शोध घेत घोडा पडला. अतिशय सिताफीचे प्रयत्न करून क्र ेनच्या साहाय्याने घोडा सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात तरु णांना यश आले.

The survivors of Sagegaon saved the life of the horse | सायगाव येथील तरु णांनी वाचविले घोड्याचे प्राण

सायगाव येथे विहिरीत पडलेला घोडा बाहेर काढतांना.

Next

येवला: सायगाव ता येवला येथे जनावरांच्या चार्याबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही त्यात जनावरे स्वत: पाण्याचा शोध घेत आहे. सायगाव फाटा येथे मगन पठारे यांच्या 50 फूट खोल विहिरीत पाण्याचा शोध घेत घोडा पडला असल्याचे आकाश कोथमिरे यांनी पाहिले. तसे घोडा विहिरीत पडला असल्याचे संदेश अनेकांना पाठवले गेले. विहिरीजवळ पाण्याच्या शोधात गेलेला घोडा विहिरीत डोकावत असतांना पाय घसरून पडला असल्याचा अंदाज कोथमिरे यांनी व्यक्त केला. दोन दिवस घोड्याचा शोध घेत कुणीच आले नाही. मग अमोल कोथमिरे, हिरामण पठारे, पवन आहेर, मयूर कोथमिरे, योगेश पठारे, रावसाहेब पठारे, सागर पगारे, मिठू बागुल, पोपट पठारे, उमेश पठारे, सोनू पठारे, सचिन आव्हाड, मुस्कान कांबळे या तरु णांना एकत्र घेऊन कोथमिरे यांनी क्र ेन बोलावले. अतिशय सिताफीचे प्रयत्न करून क्र ेनच्या साहाय्याने घोडा सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात तरु णांना यश आले. घोड्याला बाहेर काढून पाणी पाजून सोडून देण्यात आले. एवढा खोल व कोरड्या झालेल्या विहिरीत पडला असतांना देखील घोड्याला किरकोळ दुखापत झाली मात्र मोडतोड कुठेच झाली नाही याचे नवल परिसरातील, गावातील तरु ण, जेष्ठ नागरिक यांना झाले. तसेच या तरु णांचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. म्हणतात ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता.
 

Web Title: The survivors of Sagegaon saved the life of the horse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.