सूर्यकांत शिंदे : भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन; मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:58 AM2018-01-31T00:58:34+5:302018-01-31T00:59:20+5:30

नाशिक : शासकीय योजनांच्या न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद, तहसील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग के ंद्र, वनविभाग यांच्यासह विविध विभागांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे.

Suryakant Shinde: Rallying on the occasion of Govt. Schemes organized at Bhalekar ground; Information about the schemes of various departments in the meeting. The benefits of government schemes should be made available to the general public | सूर्यकांत शिंदे : भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन; मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

सूर्यकांत शिंदे : भालेकर मैदानावर आयोजित शासकीय योजनांच्या मेळाव्याप्रसंगी प्रतिपादन; मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची माहिती शासकीय योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते उद्घाटन विविध शासकीय योजनांविषयी माहिती

नाशिक : न्याय सर्वांसाठी एकच असून, विविध शासकीय योजना सर्वांच्या न्याय हक्कासाठीच असतात. त्यामुळे शासकीय योजनांच्या न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषद, तहसील, समाजकल्याण, जिल्हा उद्योग के ंद्र, वनविभाग यांच्यासह विविध विभागांच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजे. प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा केला पाहिजे व दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन विधी सेवा प्राधिकरणाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी केले. नाशिक येथील बी. डी. भालेकर मैदानावर शासकीय योजनांच्या मेळाव्याचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते मंगळवारी (दि.३०) उद्घाटन झाले. व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. अजय मिसर, जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर, मुख्य न्यायदंडाधिकारी एस. टी. डोके आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत शिंदे यांनी नागरिकांना या मेळाव्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे शासकीय सेवा व योजना आणि शासकीय योजनांच्या महा मेळाव्यात जिल्हाभरातील नागरिकांनी विविध शासकीय योजनांविषयी माहिती करून घेतली. दरम्यान, सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या महा मेळाव्यात विविध लाभार्थींना शासकीय योजनांची माहिती व माहितीपत्रांचे संबंधित विभागांच्या प्रतिनिधींनी वाटप केले. शासकीय योजनांच्या या मेळाव्यात नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे विविध योजनांचा थेट लाभ देण्यासाठी जननी सुरक्षा योजनाअंतर्गत लाभार्थी लता पगारे यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. बुक्के यांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. या मेळाव्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले कल्याण योजने अंतर्गत प्रिया अढांगळे यांना लाभ देण्यात आला. तसेच जलसंपदा विभागामार्फत नागरिकांना महाराष्ट्र लोक सेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत विविध दहा सेवांची माहिती देण्यात आली.
विविध विभागांचे ३० स्टॉल्स
महामेळाव्यात एकूण ३० स्टॉल्स उभारले आहेत. त्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, महावितरण, नाशिक महानगरपालिका, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर, पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण, महिला व बाल विकास अधिकारी नाशिक, अदिवासी विकास आयुक्तालय नाशिक, महिला सुरक्षा विशेष शाखा, जिल्हा व पशु संवर्धन आयुक्तालय नाशिक, वनविभाग नाशिक, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, जिल्हा व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालय नाशिक, जलसंपदा विभाग नाशिक, पोस्ट आॅफिस नाशिक, कामगार आयुक्त कार्यालय नाशिक, भूमी अभिलेख कार्यालय नाशिक, पाटबंधारे विभाग नाशिक, महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक, या कार्यालयांनी भाग नोंदवला.

Web Title: Suryakant Shinde: Rallying on the occasion of Govt. Schemes organized at Bhalekar ground; Information about the schemes of various departments in the meeting. The benefits of government schemes should be made available to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.