मालेगावी क्रीडा भारतीतर्फे सूर्यनमस्कार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:47 PM2021-02-20T18:47:21+5:302021-02-20T18:48:36+5:30
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी योगशिक्षक चेतन वाघ व रोहित बावीस्कर यांनी आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविले तसेच योगा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोग्य व मनस्वास्थ्य ठेवण्यासाठी क्रीडांगणावर जास्तीत जास्त वेळ देऊन देऊन विविध पारंपरिक क्रीडाप्रकार आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन क्रीडा भारतीचे प्रांतिक उपाध्यक्ष नितीन पोफळे यांनी केले. गौतम शहा यांनी मनोगत व्यक्त केले. भानू कुलकर्णी यांनी सूर्यनमस्काराचे शास्त्रीय महत्त्व पटवून दिले. खेळाडूंनी सामूहिक योगानृत्य केले. योगशिक्षक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र वाटप करण्यात आले. गौतम शहा मनोहर वैद्य संतोष पोफळे,पप्पू कासार, अमित भावसार, ओम सरोदे, स्वाती मराठे, चेतन वाघ, हरीश ब्राह्मणकर, रोहित बाविस्कर उपस्थित होते. सूत्रसंचालन गितेश बावीस्कर यांनी केले. भाग्येश कासार यांनी आभार मानले.