सूर्यनारायण कोपले, नाशिककर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:11 AM2019-04-25T01:11:42+5:302019-04-25T01:11:58+5:30
शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले.
नाशिक : शहराच्या कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिककर उष्णतेने हैराण झाले आहेत. बुधवारी (दि.२४) सूर्यनारायण कोपल्याने कमाल तापमान ४१ अंशांच्या जवळ पोहोचले. हवामान खात्याने उत्तर व मध्य महाराष्टÑात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी हंगामातील सर्वाधिक ४०.९ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले.
मुंबईच्या कुलाबा येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेने बुधवार ते शुक्रवारपर्यंत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांसह उत्तर-मध्य महाराष्टÑात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी अकरा वाजेनंतर शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उन्हात बाहेर जाताना
एप्रिल्याच्या प्रारंभीच तापमानाने चाळिशी ओलांडली होती. एप्रिलअखेर हवामान खात्याने चार दिवस उष्णतेची लाट असण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पारा या हंगामात ४४ अंशांपर्यंतही पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तर भारतात आलेल्या उष्ण लहरीचा परिणाम उत्तर-मध्य महाराष्टÑातही दिसून येत आहे.
- सुनील काळभोर, अधिकारी, हवामान केंद्र, नाशिक