गोव्यातून स्विफ्ट कार चोरणाºया संशयितास नाशकात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:25 IST2018-03-10T01:25:06+5:302018-03-10T01:25:06+5:30

नाशिक : गोव्यात फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथील भाडेतत्त्वावर घेतलेली कार चोरून नाशिकला आणणाºया संशयितास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि़ ८) अटक केली़

The suspect arrested in Swatcar car from Goa | गोव्यातून स्विफ्ट कार चोरणाºया संशयितास नाशकात अटक

गोव्यातून स्विफ्ट कार चोरणाºया संशयितास नाशकात अटक

ठळक मुद्देमहेश लहाने याच्याकडे कागदपत्रांची मागणी३ हजार ५०० रुपये भाडेतत्त्वावर कार फिरण्यासाठी घेतली

नाशिक : गोव्यात फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथील भाडेतत्त्वावर घेतलेली कार चोरून नाशिकला आणणाºया संशयितास ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (दि़ ८) अटक केली़ महेश शरद लहाने (१९, रा. सोनगिरी, ता. सिन्नर) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे हे गुरुवारी औरंगाबाद रोडवर गस्तीवर होते़ त्यांच्यासमोरून हिरव्या रंगाची क्रमांक नसलेली स्विफ्ट कार भरधाव गेली़ त्यांनी या कारचा पाठलाग करून ती सायखेडा चौफुली येथे अडविली व कारचालक महेश लहाने याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यामुळे पोलीस स्टाईलने चौकशी केली असता लहाने याने सांगितले की, गत आठवड्यात गोवा येथे फिरण्यासाठी गेलो होतो़ तेथील म्हापसा येथील ट्रॅव्हल शॉपमध्ये बनावट आधारकार्ड देऊन ३ हजार ५०० रुपये भाडेतत्त्वावर ही कार फिरण्यासाठी घेतली व चोरून नाशिकला आणल्याचे सांगितले़ या प्रकरणी म्हापसा पोलीस ठाण्यात कारचोरीचा गुन्हा दाखल आहे़ पोलीस निरीक्षक अशोक करपे, सहायक निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, दीपक आहिरे, भगवान निकम, नामदेव खैरनार, नंदू काळे, राजू सांगळे, अमोल घुगे, जालिंदर खराटे, सचिन पिंगळे, राजू वायकांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली़

Web Title: The suspect arrested in Swatcar car from Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा