संशयित चोरट्यांकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:18 PM2020-03-16T22:18:44+5:302020-03-16T22:22:43+5:30
सिन्नर : पोलिसांच्या पथकाने पाच संशयित चोरट्यांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयित चोरट्यांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या व बेवारस स्थितीत सोडून दिलेल्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे. संशयितांनी सोनसाखळी चोरणे, दरोडा, किरकोळ चोऱ्या यांची कबुली दिली असल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.

सिन्नर शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबवित असताना सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती देवी रोड परिसरात सोनू संजय जाधव (२१) व मोहन नामदेव जाधव (२०) दोघेही रा. सूर्यतळे, सिन्नर संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे दिली. पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून करन ऊर्फ दादया बाळू पिंपळे (२१), अशोक ऊर्फ भावड्या श्रावण कुवर (२८) व आकाश बर्ड (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सिन्नर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आरती सिंग, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी तपासकामी सूचना केल्या होत्या. या तपासासाठी पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, भगवान शिंदे, विनोद टिळे, समाधान बोराडे, प्रवीण गुंजाळ, मधुकर खुळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.