बलात्कारप्रकरणी संशयित डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:23 PM2018-11-15T17:23:32+5:302018-11-15T17:26:39+5:30
संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरिरराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा
नाशिक : उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाच्या शारिरिक तपासणीच्या नावाखाली सिडको येथील शिवाजी चौकामधील एका संशयित डॉक्टरने बलात्कार केल्याचा गुन्हा अंबड पोलिसांनी दाखल केला आहे. संशयित डॉ. नितिन विजय गावंडे (४४,रा. इंदिरानगर) यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिडको परिसरातील शिवाजी चौकातील दवाखान्यात महिला रुग्ण आॅक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत उपचार घेत होती. दरम्यान, संशयित गावंडे यांनी महिलेसोबत सलाईन लावण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. ‘पोटात सूज आली आहे, त्यामुळे मला आतून तपासावे लागेल’ असे सांगून शरिरराच्या नको त्या अवयवांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच संशयिताने पिडित महिलेशी अश्लील भाषेत लैंगिक शारिरिक संबंधाबाबत संवाद साधत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. अंबड पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित डॉक्टरविरूध्द विनयभंग व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी गावंडे यांना अटक केली