चांदवड दरोड्यातील संशयित जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:32 AM2018-03-05T01:32:36+5:302018-03-05T01:32:36+5:30
चांदवड : प्राध्यापकाच्या घरावर दरोडा टाकून पावनेदोन लाख रुपयांची लूट करणाºया दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
चांदवड : शहरातील प्राध्यापकाच्या घरावर दरोडा टाकून बेदम मारहाण करत पावनेदोन लाख रुपयांची लूट करणाºया सराईत दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर जिल्ह्यातून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्तही केला आहे. मुकेश मच्छिंद्र गायकवाड (२९) रा. नेवरगाव जि. औरगांबाद, गोरख मधुकर पिंपळे (२९) रा. उरली कांचन ता. हवेली, जि. पुणे हल्ली पाचेगाव फाटा, ता. नेवसा, अहमदनगर अशी संशयितांची नावे आहेत. चांदवड येथील डावखरनगर परिसरात सुयोग गवारे यांच्या घरी २४ फेब्रुवारी रोजी दरोडा पडला होता. चार ते पाच दरोडेखोरांनी प्रा़ सुयोग गवारे यास मारहाण करून एक लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता. याप्रकरणी गवारे यांच्या तक्रारीवरून चांदवड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, यांच्या मार्गदर्शनाखाली नगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडेखोरांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राम कर्पे, उपनिरीक्षक स्वप्निल नाईक, अरुण पगारे, हवालदार रवि वानखेडे, संजय गोसावी, सुशांत मरकड, मंगेश गोसावी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप लगड , अमित बोडके यांच्या पथकाने रात्रभर सापळा रचून अहमदनगर जिल्ह्यातील कमलापुरा येथून संशयित मुकेश गायकवाड, गोरख पिंपळे यांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून महिंंद्रा स्कॉर्पिओ कार क्रमांक एम.एच. १६/ बी.एच. ०३८६ व समॅसंगचे दोन मोबाइल, रोख ३७०० रुपये तसेच दरोड्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य गिरमीट, टॉमी असा सहा लाख ५८ हजार ७५० रुपयांचा माल जप्त केला. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच चांदवड येथील दरोड्याची त्यांनी कबुली दिली. तसेच फरार असलेले त्यांचे साथीदार सागर मोहन चव्हाण, रा.पाचेगाव फाटा, नेवासा, योगेश काळे (रा. वडाळा महादेव ता. श्रीरामपूर), बबलू यांच्यासह दोघांची नावे सांगितली़