फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:57 AM2018-12-22T00:57:40+5:302018-12-22T00:57:54+5:30

फसवणूक व घरफोडीच्या गुन्ह्यात गत तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने देवळाली कॅम्प परिसरातून अटक केली. सतीश ऊर्फ बाबा कैलास शिंदे (२२, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प), शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (२५, रा. भगूर, देवळाली कॅम्प) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

The suspects arrested for cheating fraud | फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक

Next

नाशिक : फसवणूक व घरफोडीच्या गुन्ह्यात गत तीन वर्षांपासून फरार असलेल्या दोघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने देवळाली कॅम्प परिसरातून अटक केली. सतीश ऊर्फ बाबा कैलास शिंदे (२२, रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प), शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (२५, रा. भगूर, देवळाली कॅम्प) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयित सतीश ऊर्फ बाबा कैलास शिंदे याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात २०१५ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तो गत तीन वर्षांपासून फरार होता़ युनिट दोनचे पोलसी नाईक संजय ताजणे यांना संशयित शिंदे हा चारणवाडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यास राहत्या घरातून शिताफीने अटक करण्यात आली़ त्यास अधिक तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
संशयित शहानवाज ऊर्फ शानू अश्पाक शेख (२५, रा. भगूर, देवळाली कॅम्प) याने सिन्नर शहरात घरफोडी केल्यानंतर भगूरमध्ये असल्याची माहिती युनिट दोनचे सहायक उपनिरीक्षक श्यामराव भोसले यांना मिळाली़ त्यानुसार सापळा रचून घरफोडीतील मुद्देमालासह त्यास अटक करण्यात आली असून, शेख यास सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़
सराईत गुन्हेगार तडीपार
गुन्हेगारी कारवाईमुळे इंदिरानगरसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार फकिरा दत्ता सावंत (२६ ,रा सदिच्छानगर) या पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी तडीपार केले आहे़ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई सुरु केली आहे़ या कारवाईनुसार सराईत गुन्हेगार फकिरा दत्ता सावंत यास उपायुक्त कोकाटे यांनी एक वषार्साठी तडीपार केले आहे़

Web Title: The suspects arrested for cheating fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.