चरस विक्रीसाठी आलेल्या संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:32 AM2019-03-13T00:32:51+5:302019-03-13T00:33:51+5:30
भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
नाशिक : भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून १२० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यासीन हा मुंबईतून चरससारखा अमली पदार्थ नाशकात विक्री करण्यासाठी आणत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सोमवारी (दि.११) पहाटे ४ वाजेच्या सुमारास सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी हवालदार रवींद्र बागुल, प्रवीण कोकाटे, आसीफ तांबोळी, शांताराम महाले, रावजी मगर, विशाल काठे, विशाल देवरे आदींनी जुने नाशिक परिसरातील खडकाळी येथे सापळा रचला.
यासीन या भागात पहाटेच्या सुमारास आला असता छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता १२० ग्रॅम चरस आणि मोबाइल असा ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.