कारमधील संशयितांनी आयफोन हिसकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:46 AM2018-07-22T00:46:41+5:302018-07-22T00:46:56+5:30

‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़

 The suspects in the car escaped the iPhone | कारमधील संशयितांनी आयफोन हिसकावला

कारमधील संशयितांनी आयफोन हिसकावला

Next

नाशिक : ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़  पाथर्डी फाट्यावरील गजानननगरमध्ये अठरा वर्षीय यश संधान हा तरुण राहतो़ शुक्रवारी दुपारच्या सुमारास यश हा कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होता़ त्यावेळी एका पांढºया रंगाच्या इंडिका कारमधून दोन संशयित आले़ त्यांनी यशच्या जवळ जात ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ असे म्हणत आयफोन मोबाइल बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांना यशने नकार देताच या दोघांनी बळजबरीने मोबाइल हिसकावला व फरार झाले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
द्वारका परिसरातून बुलेटची चोरी
द्वारकाजवळील माणेकशा नगरमधील रहिवासी प्रणव चांडोले (रा़ विष्णूसागर अपार्टमेंट) यांची ९० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेट (एमएच १५, जीएच ७००५) चोरट्यांनी १६ व १७ जुलै या कालावधीत चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मटका अड्ड्यावर छापा
देवळाली गावातील वसुंधरा फर्टिलायझर दुकानाच्या मागे आकड्यांवर मटका जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि़२०) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी संशयित बाळू भिंगारे याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़
मांस बाळगल्याप्रकरणी गुन्हा
चिकन शॉपच्या शेजारी विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरांचे ३० किलो मांस बाळगणाºया शमशुद्दीन शहा (रा़ चिंचोळे गाव, अंबड) याच्या विरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
रिक्षा लावण्याच्या कारणावरून मारहाण
मित्राला भेटण्यासाठी वज्रेश्वरी झोपडपट्टीत गेलेल्या सचिन सूर्यवंशी (रा़ पेठरोड) यास संशयित एजाज शेख व यासीन शेख या दोघांनी रिक्षा लावण्याच्या कारणावरून कुरापत काढून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी एजाज व यासीन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  The suspects in the car escaped the iPhone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.