संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:19 PM2022-02-14T22:19:25+5:302022-02-14T22:20:00+5:30
देवळा : सात वर्ष प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप, कुटुंबाच्या मदतीने प्रियकराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न आणि ह्यव्हॅलेंटाइन डेह्णच्या पूर्वसंध्येला उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाल्यानंतर संशयित आरोपींवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ह्या घटनेत अटक झालेल्या पाच जणांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता युवकाच्या मृत्यूनंतर देवळा पोलिसात कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), वडील गोकुळ तोंगल सोनवणे (५७,), आई निर्मला गोकुळ सोनवणे (५२), भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे (३० ) व प्रसाद गोकुळ सोनवणे (१८,) (सर्वजण रा. रावळगाव, ता - मालेगाव ) यांच्यावर कलम ३०७, ३४, व ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व सहकारी करत आहेत.