आरोग्य विभागातील आठ कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:35 AM2018-09-12T00:35:27+5:302018-09-12T00:36:36+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधानकारक नसलेल्या आरोग्य विभागातील आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सर्व संबंधितांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधानकारक नसलेल्या आरोग्य विभागातील आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. सर्व संबंधितांच्या निलंबनाचे आदेश तत्काळ ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याची एकत्रित आढावा बैठक महिरावणी येथील दामोदर सभागृहात घेण्यात आली. आरोग्य विभागाचा आढावा घेताना डॉ. गिते यांना गरोदर माता नोंदणी, मातृत्व अनुदान वाटप यांसह राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या योजनेत काही ठिकाणी अतिशय कमी काम असल्याचे आढळून आले. जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सूचना देऊनही कामात प्रगती नसल्याने जातेगाव आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षक राजेंद्र भानुसे, एकनाथ वाडे, शिंदे येथील आरोग्य पर्यवेक्षिका, लहवित येथील आरोग्य पर्यवेक्षक, आंबोली येथील आरोग्य पर्यवेक्षक श्रीमती पाटील, जलालपूर येथील गैरहजर आरोग्य सेविका, रोहिले येथील आरोग्य पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. शिंदे आरोग्य केंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका यांनाही सेवेतून कमी करण्याचे निर्देश देण्यात आले.
पोषण आहार अभियानातही जिल्ह्णाचे काम जोरात सुरू असून, आतापर्यंत जिल्हा देशात पुढे आहे. पोषण आहार, स्वच्छता हीच सेवा यामध्ये जिल्हा देशात पुढे राहील व नाशिक जिल्ह्णाची चर्चा सर्वत्र होईल यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी दिल्या.
आढावा बैठकीत पोषण आहार अभियानाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. गिते यांनी कुपोषण, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ सर्वेक्षण यामध्ये देशभरात नाशिकच्या कामाची चर्चा होत असून, जिल्ह्णात राबविण्यात येणाºया विविध योजनांमध्ये जोमाने काम सुरू आहे. सर्व योजनांमध्ये जिल्हा अव्वल करावयाचा असून, सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले.