पुनर्स्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:50 AM2018-11-16T00:50:05+5:302018-11-16T00:50:40+5:30

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाºयांना अजूनही वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

Suspended employees' efforts for reinstatement | पुनर्स्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

पुनर्स्थापनेसाठी निलंबित कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

Next

नाशिक : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाºयांनी पुनर्स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी याप्रकरणी संबंधितांमध्ये सुधारणा आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता असेल तरच प्रस्तावावर विचार करण्याचा निर्णय घेतल्याने अशा कर्मचाºयांना अजूनही वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या निलंबित कर्मचाºयांना पुनर्स्थापना मिळावीसाठी विविध माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.
सुरगाणा येथील प्रकाश अहिरे या ग्रामसेवकास कर्तव्यात कसूर केल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेतून निलंबित केले होते. ग्रामपंचायत विभागाने ग्रामसेवकाच्या पुनर्स्थापनेचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र सदर ग्रामसेवकाने त्याचेकडील दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नसल्याचे सुरगाणा येथील गटविकास अधिकारी केशव गडडापोड यांनी निर्दशनास आणून दिल्याने डॉ. गिते यांनी सदरची नस्ती विभागास परत करत सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करूनच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ग्रामपंचायत विभागाला दिले आहेत.
गिते यांचे निर्देश
प्रस्ताव दाखल होत असले तरी काही आक्षेप अजूनही कायम असताना आणि कामकाजाची पूर्तता केलेली नसल्याने असे प्रस्ताव कोणत्याही कारणास्तव मंजूर करण्यात येणार नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. प्रस्ताव सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता करूनच सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी दिले आहेत.

Web Title: Suspended employees' efforts for reinstatement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.