शेजवळ खुनातील संशयित फरारच

By admin | Published: January 22, 2017 12:06 AM2017-01-22T00:06:16+5:302017-01-22T00:06:35+5:30

शिवसेना कार्यकर्ता : परिसरात तणाव; मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका

Suspended fugitive in Shajawal murder | शेजवळ खुनातील संशयित फरारच

शेजवळ खुनातील संशयित फरारच

Next

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणीपार्क येथे शिवसेनेचा इच्छुक उमेदवार सुरेंद्र शेजवळ याची हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. या खुनाच्या घटनेमुळे जेलरोड भागात तणाव व दहशतीचे वातावरण पसरले असून, शनिवारी सायंकाळी शेजवळ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  जेलरोड कॅनॉलरोड मगळ मळा येथील सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या सिद्धार्थ शेजवळ (वय ३४) हा जेलरोड प्रभाग १८ अनुसूचित जाती गटातून शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार होता. गेल्या मनपा निवडणुकीत सुरेंद्र याने मनसेकडून, तर काही महिन्यांपूर्वीच झालेल्या पोटनिवडणुकीत त्याची आई शांताबाई यांनी मनसेकडून निवडणूक लढविली होती. पाच-सहा दिवसांपूर्वीच सुरेंद्र याने शिवसेनेत प्रवेश घेतला असून, तो प्रबळ दावेदार होता. बिटको चौकाजवळ २००८ मध्ये पिंटू डिग्रसकर खुनाच्या प्रकरणात संशयित सुरेंद्र शेजवळ याची निर्दोष मुक्तता झाली होती, तर पोट निवडणुकीत प्रचारादरम्यान डिग्रसकर याच्या घराजवळ वाद झाल्याने सुरेंद्र व इतर सहकाऱ्यांविरुद्ध गोळीबार करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. जेलरोड त्रिवेणी पार्क इंद्रलोक सोसायटीत राहणारा विक्रम पोरजे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, प्रभाग १८ मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार नगरसेवक अशोक सातभाई, सुरेंद्र शेजवळ, माजी नगरसेवक प्रकाश बोराडे, खिलेंद्र खाबिया, सचिन रौंदळ, स्वत: पोरजे यांनी शुक्रवारी सायंकाळी ५ ते ८.३० पर्यंत राजराजेश्वरी मंगल कार्यालय भागात घरोघरी प्रचार केला.  त्यानंतर सातभाई यांच्या कार्यालयात आम्ही सर्वजणांनी चर्चा केली. रात्री ९.१५ वाजता सुरेंद्र शेजवळ हा आपली अ‍ॅक्टिवा (एमएच १५ एफई ३२५२) हिच्यावरून विक्रम पोरजे याला त्रिवेणी पार्क येथे घरी सोडण्यास आला. त्याठिकाणी काही मित्र असल्याने गाडी थांबविताच पाठीमागून आलेल्या तपकिरी रंगाच्या इस्टीम गाडीने शेजवळ याच्या अ‍ॅक्टिवाला जोरदार धडक दिल्याने सुरेंद्र व पोरजे हे दोघे रस्त्यावर पडले. तितक्यातच इस्टीम गाडीतून कोयते, चॉपर घेऊन उतरलेल्या पाच-सहा जणांनी आमच्याकडे धाव घेताच मी त्रिवेणी पार्कच्या आतील बाजूने पळालो, तर सुरेंद्र हा जेलरोडच्या दिशेने पळू लागला. मात्र तितक्यात हल्लेखोरांनी त्याला गाठून कोयते, चॉपरनी हल्ला केला. पोरजे हा घटनास्थळी आला असता शेजवळ मयत स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

Web Title: Suspended fugitive in Shajawal murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.