माणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबित
By Admin | Published: February 9, 2016 11:44 PM2016-02-09T23:44:45+5:302016-02-09T23:48:25+5:30
माणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक निलंबित
सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या तालुक्यातील माणी येथील शासकीय कन्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह अन्य दोन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विविध कारणास्तव शासकीय आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असतात. माणी येथील शासकीय कन्या आश्रमशाळेच्या कोठीतून २८ डिसेंबर रोजी ९ तेल डब्यांची चोरी झाली होती. अशा प्रकारच्या चोऱ्या याअगोदरही दोन वेळा झालेल्या आहेत. या चोरी प्रकरणी तेथील चौकीदार जयराम मोरे यांना प्रकल्पाधिकारी डी. गंगाथरण यांनी दोषी ठरवत निलंबनाची कारवाई केली होती.
त्यानंतर २१ जानेवारी रोजी या कन्या आश्रमशाळेस आमदार समितीने अचानक भेट दिली असता तेथील विद्यार्थिनींनी अनेक तक्र ारींचा पाढा या समितीसमोर वाचला. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी २५ जानेवारी रोजी आदिवासी विकास आयुक्त श्रीमती पोंक्षे, कळवण प्रकल्पाधिकारी डी. गंगाथरण यांनी संबंधित विद्यार्थिनींशी सुमारे दोन तास चर्चा केली होती. यात तथ्य आढळल्याने दोन दिवसापूर्वी तेथील मुख्याध्यापक हेमलता सावकार व प्रभारी वसतिगृह अधीक्षिका श्रीमती एस.डी.फेगडे यांच्यावर आयुक्त कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई करण्यात
आली.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे आश्रमशाळा कर्मचारींमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)