बालिकेवर अत्याचार प्रकरणातील संशयित बालगुन्हेगार सुधारगृहात

By admin | Published: May 18, 2014 07:57 PM2014-05-18T19:57:00+5:302014-05-18T23:50:41+5:30

नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

Suspended petticoat reform home in the house atrocity case | बालिकेवर अत्याचार प्रकरणातील संशयित बालगुन्हेगार सुधारगृहात

बालिकेवर अत्याचार प्रकरणातील संशयित बालगुन्हेगार सुधारगृहात

Next

नगरसूल : बालिकेवरील लैंगिक अत्याचारातील संशयित आरोपीची नाशिक येथील बालगुन्हेगार न्यायालयाने बालसुधारगृहात रवानगी केली आहे, तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालिकेच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
नगरसूल येथे दोनवर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला होता. बालिकेचे कुटुंब येथील रेल्वे स्थानकावर भिक मागून उदरनिर्वाह करते. वडील अंध, आजी मानसिक रुग्ण, दोन लहान मुले व एक बालिका मिळेल त्या जागेचा आसरा घेत वास्तव्य करत आहे. अशा या कुटुंबातील बालिकेवर माणुसकीला काळिमा फासत एका नराधमाने लैंगिक अत्याचार केले. काल (दि. १७) रोजी बालिकेच्या आजीने येवला तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने तालुका पोलिसांनी कैलास बाळू पवार (११) या अल्पवयीन युवकास संशयावरून अटक केली. आज सदर संशयितास नाशिक बालगुन्हेगार न्यायालयात हजर करण्यात आले होते. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक राम भाऊसिंग, पो.हवालदार वाय.एस. खैरे, के.आर. आवारी आदि करत आहेत.
दरम्यान, या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करून खर्‍या नराधमावर तत्काळ कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Suspended petticoat reform home in the house atrocity case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.