चलार्थपत्र मुद्रणालयातील  दोन कामगार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:35 AM2018-06-12T00:35:08+5:302018-06-12T00:35:08+5:30

चलार्थपत्र मुद्रणालयात तीन दिवसांपूर्वी अधिकारी व कामगारांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने दोन कामगारांना निलंबित केल्याचे वृत्त आहे.

 Suspended two workers in the printing press | चलार्थपत्र मुद्रणालयातील  दोन कामगार निलंबित

चलार्थपत्र मुद्रणालयातील  दोन कामगार निलंबित

Next

नाशिक : चलार्थपत्र मुद्रणालयात तीन दिवसांपूर्वी अधिकारी व कामगारांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने दोन कामगारांना निलंबित केल्याचे वृत्त आहे. चलार्थपत्र मुद्रणालयात गेल्या शुक्रवारी अधिकारी व कामगारांमध्ये वादविवाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती मुद्रणालय महामंडळापर्यंत गेली होती. त्या पार्श्वभूमीवर चलार्थपत्र मुद्रणालयाचे महाप्रबंधक के.एन. महापात्र यांनी कामगार जी. वाय. काळे व एस. जी. घुगे यांना सोमवारी निलंबित केले आहे. घुगे मुद्रणालय मजदूर संघाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. या कारवाईची कामगारवर्गात चर्चा सुरू आहे.

Web Title:  Suspended two workers in the printing press

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक