सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 06:41 PM2018-10-17T18:41:52+5:302018-10-17T18:42:06+5:30

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अ‍ॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले.

Suspenders trying to break Sinnar ATM are arrested | सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

Next

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अ‍ॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले.
रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महामार्गालगत मार्केट यार्ड परिसरात अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार भगवान शिंदे, समाधान बोºहाडे, अन्नू अहेर, म्हाळू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी करीत शहर व परिसरात शोध मोहिम राबविण्यास प्रारंभ केला.
या शोधमोहिमेत पोलिसांना संशयित बलराम प्रसाद कन्हैय्या महतो (रा. मुबारकपूर, ता, माझी, जि, छपरा, बिहार, हल्ली रा, शंकरनगर, मुसळगाव, एमआयडीसी) हा शिर्डी रोडने मुसळगावकडे जात असतांना कुंदेवाडी फाट्याजवळ मिळून आला. पोलिसांनी त्यास हटकले असता तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र लोखंडे, चकोर करीत आहेत.


 

Web Title: Suspenders trying to break Sinnar ATM are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस