चार स्वस्त धान्य दुकानांवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 09:24 PM2020-05-03T21:24:57+5:302020-05-03T21:26:23+5:30
येवला : तालुक्यातील चार स्वस्त धान्य दुकानांमधील धान्य वितरणासह इतर त्रुटी आढळून आल्याने तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी या चारही स्वस्त धान्य दुकानांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
येवला : तालुक्यातील चार स्वस्त धान्य दुकानांमधील धान्य वितरणासह इतर त्रुटी आढळून आल्याने तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी या चारही स्वस्त धान्य दुकानांवर निलंबनाची कारवाई केली आहे. स्वस्त दुकानामध्ये धान्य वाटपाबाबत पुरवठा विभाग व तहसील कार्यालयाकडे अनेक तक्र ारी प्राप्त झाल्या होत्या. पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. यामुळे तहसीलदार वारुळे यांनी अंदसूल येथील स्वस्त धान्य दुकानदार पी. जे. महाले, गणेश शांताराम कांबळे, नागडे येथील सखी महिला स्वयंसहायता बचतगट व कुसूर येथील एम.के. गायकवाड यांच्या नावे असलेल्या दुकानांवर निलंबनाची कारवाई केली आहे. रेशनकार्डधारकांना शासकीय नियमापेक्षा कमी धान्य देणे, शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशिनच्या पावत्या न देणे यासह विविध कारणांमुळे तालुक्यातील या चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.