सटाण्यातील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:37 PM2018-12-15T22:37:13+5:302018-12-15T22:37:28+5:30
नाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलीस सेवेतून निलंबित केले आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा पोलीस ठाण्यात सापळा रचून सूर्यवंशी यास शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले होते़

सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरोधात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास केशव सूर्यवंशी यांच्याकडे होता़ त्यांनी यापूर्वीच संबंधित संशयितास अटकही केली होती़ त्यानंतर तक्रारदारास दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात अटक करणार असल्याचे सांगून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी सापळा रचून सूर्यवंशी यास रंगेहाथ पकडले होते़
सटाणा पोलीस ठाण्यात सूर्यवंशीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन अटक होताच दराडे यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत़ या आदेशात निलंबन काळात सूर्यवंशी यांना ग्रामीण पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षकांकडे दिवसातून दोन वेळा हजेरी तसेच लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे म्हटले आहे़