विस्थापित शिक्षकांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:54 AM2018-08-04T00:54:16+5:302018-08-04T00:55:39+5:30

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Suspension of displaced teachers fasting | विस्थापित शिक्षकांचे उपोषण स्थगित

विस्थापित शिक्षकांचे उपोषण स्थगित

Next
ठळक मुद्देआयुक्तांची हतबलता :कारवाई करण्यास बांधील नसल्याचे उत्तर

नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तूर्त स्थगित
केले असून, लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्या वतीने बोगस शिक्षक प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी काही महिला शिक्षकांची प्रकृती खालावल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून उपोषण सोडण्याबाबत दबाव आणण्यात आल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांच्या संघटनेने केला आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यास आम्ही बांधील नसल्याचे उत्तर विभागीय कार्यालयाकडून देण्यात आल्याचे विस्थापित संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपशिक्षणाधिकारी एल.डी. सोनवणे, उपायुक्त सुखदेव बनकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोषी शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले. उपोषणकर्त्या २८ शिक्षकांच्या बाबतीत कार्यालयाकडून शासनाकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवून त्यांना न्याय दिला जाणार असल्याचे आश्वासनदेखील देण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी योग्य तो न्याय न मिळाल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Suspension of displaced teachers fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.